मुंबई : ठाकरे सरकारकडून करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी ठाणे आणि वसईमधील आकडेवारी सादर करत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत.
वसई विरार शहरात 1 ते 13 एप्रिल काळात 201 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. पालिकेने मात्र 23 मृत्यू दाखवले आहेत. आयुक्त म्हणतात खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, सुधार करु. ठाण्यात स्मशानभूमींमध्ये 309 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात 57 करोना मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे, अशी माहिती देत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे
दरम्यान, यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्विटरला पोस्ट केला आहे.
कॉरोना मृतांची नोंद, ठाकरे सरकारची लपवाछपवी
1 ते 13 एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाले. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत
ठाणे महापालिका क्षेत्रात 57 कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे, परंतू स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार 309 झाले असल्याची नोंद आहे pic.twitter.com/k1gbDku0So
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 15, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे- चंद्रकांत पाटील
“शरद पवारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं”
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”