मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार समाधान आवाताडे यांचा प्रचार करण्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सध्याचे मुख्यमंत्री फक्त एका पक्षाचेच प्रमुख असल्यासारखे वागतात. शरद पवार साहेबांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री बनवलं आणि स्वत: सरकारच्या बाहेर राहिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पनाच नाही. मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून फिरावं म्हणजे त्यांना वास्तवाची जाणीव होईल, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण”
देवेंद्र फडणवीस 5 वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?; जयंत पाटलांचा सवाल