सांगली : मुळात करोना हा रोग नाही. करोनानं माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी संभाजी भिडे यांचा समाचार घेतला.
“करोना संकटकाळात समाजात गैरसमज करणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत. सध्या अनेकांना करोनाची बाधी झाली आहे. एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात अशाप्रकारची वक्तव्य करुन लोकांची दिशाभूल केली जात आहे. हे अयोग्य आहे. सध्या राज्य सरकार आणि समाज करोनाच्या संकटाचा सामना करत आहे. अशावेळी आंबे खाल्ल्यावर मुलं होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधानं होत असतील, तर ते अयोग्य आहे,” असं पाटील म्हणाले. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
“एरवी अशी वक्तव्यं खपून जातात. पण सध्याच्या परिस्थितीत अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचं गांभीर्य कमी होतं. कोणीही उठून काहीही बोलायला लागलं तर सरकार आणि समाजाकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांमध्ये बाधा निर्माण होईल. त्यामुळे अशी वक्तव्यं कायद्याच्यादृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे. संभाजी भिडे पुन्हा अशाप्रकारचं धाडसी विधान करणार नाहीत,” असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…हे भाजपाचे राजकारण नाही तर काय सुरू आहे – नवाब मलिक
सनरायझर्स हैदराबादने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
…म्हणून भाजपनं 6 वेळा माझं तिकीट कापलं; अमित शहांनी केला मोठा खुलासा
राज्यात 8 दिवसांच्या कडक लाॅकडाऊनची शक्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे