नागपूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाबाबत दाखल याचिकेनंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यावर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“उच्च न्यायालयाने अतिशय स्पिकिंग ऑर्डर दिली होती. ज्याप्रकराचं हे संपूर्ण प्रकरण आहे, या प्रकरणात सीबीआयने चौकशी केली पाहिजे, असं उच्च न्यायालयाने कारणासह सांगितलं होतं. तरी देखील सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारने जाण्याचा प्रयत्न केला. स्वतः माजी मंत्री महोदय देखील गेले. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जी टिप्पणी केली आहे, ती मला असं वाटतं अत्यंत महत्वाची आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विशेषकरून महाविकास आघाडीमधील जे नेते या संदर्भात बोलत होते. त्यांना उत्तर देणारी टिप्पणी, ही सर्वोच्च न्यायलयाने केली आहे. मला असं वाटतं की आता योग्य अशाप्रकारची चौकशी होईल आणि चौकशीमधून खरं-खोटं बाहेर निघेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असंही देवेंद्रे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“दादा मास्क काढा” भाषणादरम्यान अजित पवारांना चिठ्ठी; त्यावर अजित पवार म्हणतात…
कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे, हे फडणवीसांनी दाखवून द्यावं- जयंत पाटील
“मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही”
मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, आता लस विकू नका म्हणजे झालं- अतुल भातखळकर