मुंबई : राज्यात सध्या कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याचं आणि पुढील 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा सध्या शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसिकरणातील कामगिरीच्या आधारावर, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत.
महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान
यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार)
लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसिकरणातील कामगिरीच्या आधारावर! (1/8)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2021
“व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड उपलब्ध नाही! मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लस येत आहेत, येत राहतील. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का?” असा सवालही फडणवीसांनी केला आहे.
व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही,
रेमडेसिवीर उपलब्ध नाही,
ऑक्सिजन उपलब्ध नाही,
साधे बेड उपलब्ध नाही!
मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही.
लस येत आहेत, येत राहतील.पण,प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते.याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का?
(7/n)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, आता लस विकू नका म्हणजे झालं- अतुल भातखळकर
कोणत्या शहाण्याने मास्क लावण्याचा सिद्धांत काढला?- संभाजी भिडे
वकील आहात, त्यामुळे लहान शेंबड्या मुलांसारख्या शपथा खाऊ नका- नितेश राणे
शपथा घेऊन सुटका होत नसते- अतुल भातखळकर