मोठी बातमी! रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी

0
435

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीनं रुपाली चाकणकर यांना कार्यालयात तोडफोड करुन पेटवून देण्याची धमकी दिली आहे. जयंत पाटील हे तांबवे येथील रहिवाशी आहेत. रुपाली चाकणकर यांचं धायरी येथे कार्यालय आहे. या कार्यालयात काल सायंकाळी सदर व्यक्तीनं फोन करुन कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली.

दरम्यान, धमकीचा फोन आला तेव्हा रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या माघारी परतल्यानंतर सदर घडलेला प्रकार स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी रुपाली चाकणकर यांना सांगितला. त्यानंतर चाकणकर यांनी सरळ सिंहगड रोड पोलीस स्टेशन गाठलं. सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली. तक्रार दाखल केल्यानंतर सिंहगड पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार”

“सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू”

“नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात”

“पुण्यात मनसेचं खळखट्याक; कोंढव्यातील ॲमेझॉनचं ऑफिस फोडलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here