Home महाराष्ट्र “अजिंक्य रहाणेची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्णच”

“अजिंक्य रहाणेची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्णच”

मुंबई : काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात क्रिकेटर अजिंक्य रहाणेने आपल्या आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण अजिंक्यची ही इच्छा अपूर्णच राहिली आहे. अजिंक्य रहाणेची आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचं निधन झालं आहे. अजिंक्यसाठी हा खूप मोठा धक्का आहे. अजिंक्यचे बाबा मधुकर बाबूराव रहाणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

अजिंक्य सध्याच्या घडीला आयपीएलची तयारी करत असून अजिंक्य आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना 10 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी तयारी करत असताना अजिंक्यला ही वाईट बातमी समजली आहे.

अजिंक्यने काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये आजीला भेटायची खूप इच्छा असल्याच सांगितलं होतं. संगमनेरला कधी जाणार, असा प्रश्न अजिंक्यला काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीध्ये विचारण्यात आला होता. त्यावेळी अजिंक्य म्हणाला होता की, कोरोनीचा परिस्थिती सुधारल्यावर मी आजीला भेटायला जाणार आहे. माझी आजी संगमनेरला असते तिला भेटायची माझी इच्छा आहे. पण सध्याच्या कोरोनाच्या काळात मला तिला भेटता आलेले नाही. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती सुधारली की लगेचच मी माझ्या आजीची भेट घेण्यासाठी संगमनेर येथे जाणार आहे.

दरम्यान, आता अजिंक्यला आता आजीला भेटता येणार नाही. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

MPSC परीक्षार्थींसाठी रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

“येत्या 40 दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल”

“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरुवात, आगे आगे देखो होता है क्या?”

“कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन, सरकार महाराष्ट्राची फसवणूक करतंय”