Home महाराष्ट्र दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात टाका; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात टाका; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात टाका, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करणं चांगलं नाही. सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करावा. व्यापाऱ्यांना 2-3 दिवस दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. नागरिकांना वीजबिल माफी द्यावी. कर्जवसुलीसंदर्भात सरकारने बँकांशी बोलावं. शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. लसीकरणासाठी वयाचं बंधन नसावं, अशा काही महत्त्वाच्या मागण्या राज ठाकरेंनी सरकारकडे केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

येत्या 8 दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?- रूपाली चाकणकर

“देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यामुळे मराठा समाजाची बदनामी, बोलवता धनी कोण याचा खुलासा करणार- मराठा क्रांती मोर्चा