Home महाराष्ट्र “देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

“देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊन लागू”

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच राज्यात मिनी लाॅकडाऊनची घोषणा केली आहे, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर राज्यात राजकिय वातावरण तापेल की काय! अशी चिंता व्यक्त केली जात होती. भाजपने राज्यात लॉकडाऊन होऊ नये, यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे मनसेने लॉकडाऊनविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्याकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच राज्यात कडक निर्बंधाची घोषणा केली आहे, असं सामनात म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनारुग्ण वाढत आहेत. याबाबद्दल ज्यांना राष्ट्रीय पातळीवर राजकीय चिंता वाटते त्यांनी महाराष्ट्राने लसीकरणाबाबत केलेल्या विक्रमाची नोंद घ्यायला नको काय? शनिवारी एकाच दिवशी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. याबाबद्दल दिल्लीश्र्वरांना महाराष्ट्राची पाठ थोपटावीच लागेल, असं मत सामना अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यामुळे मराठा समाजाची बदनामी, बोलवता धनी कोण याचा खुलासा करणार- मराठा क्रांती मोर्चा

“दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही?; नारायण राणेंचा सवाल

“सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल”