मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सीबीआय तपासाचा आदेश दिला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून या प्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.
याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. तसेच बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने परिपत्रक जारी करुन दिला आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात निकाल लागताच अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी कोण, याचाही खुलासा करणार, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने यावेळी दिला.
महत्वाच्या घडामोडी –
“दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही?; नारायण राणेंचा सवाल
“सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल”
आता नवा वसूली मंत्री कोण?; अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा सवाल