मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतरही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे बैठक झाली. त्यावेळी राजीनामा न घेण्याचा निर्णय झाला. शरद पवारांनी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण खोटं पडल्यानंतर त्यांनी बोलणंच बंद केलं. पण शरद पवार निर्णय घेत नाहीत तोवर राजीनामा झाला नसता. त्यामुळे मी समाधान व्यक्त करतो. शरद पवारांनी संवेदनशीलतेने सीबीआयचा तपास लागल्यावर मंत्रीपदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून निर्णय घेतला आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, जो चुकेल त्याला शासन मिळाल्याशिवाय लोकशाही सुदृढ होणार नाही. शासन मिळाल्याशिवाय लोकशाही बळकट होणार नाही, असं म्हणत राज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
फडणवीसांनी उशिरा का होईना मदत केली, आभारी आहे- रोहित पवार
अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना
“मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास CBI कडे”
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…