Home महाराष्ट्र फडणवीसांनी उशिरा का होईना मदत केली, आभारी आहे- रोहित पवार

फडणवीसांनी उशिरा का होईना मदत केली, आभारी आहे- रोहित पवार

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘वीकेंड लॉकडाऊन’ म्हणजे शनिवार-रविवारी लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला भाजपचा पाठिंबा असून जनतेने देखील पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा तसेच लसीकरणाच्या मोहिमेस मदत करावी, असं आवाहन देखील फडणवीसांनी यावेळी केलं. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्या हितासाठी उशिरा का होईना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जींकडून सहकार्य मिळाल्याचं पाहून बरं वाटलं! केंद्राकडील प्रलंबित निधी आणि लसीचे पुरेसे डोस मिळण्यासाठीही त्यांचं असंच सहकार्य मिळेल, ही अपेक्षा! तसंच राज्यात हातावर पोट असलेल्यांसाठी एखादी योजना आणण्याची गरज आहे., असं रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना

“मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास CBI कडे”

पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“अभिनेता अक्षय कुमारची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”