पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच आपल्याला एकत्र आणलं आहे. त्यामुळे आंबेडकर स्वीकारायचे की गोळवलकर हे आता देशाने ठरवायचं आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
हिटलरने जे जर्मनीत घडवले तेच सध्या आपल्या देशात घडवण्याचा प्रयत्न होत आहे. संविधानावरील हल्ल्याविरोधात महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या अहिंसेच्या मार्गानेच पुढे जावे लागणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ‘संविधान बचाओ, देश बचावो’ या महासभेचे आयोजन गुरुवारी सारसबाग परिसरात करण्यात आले होते. या वेळी जितेंद्र आव्हाड बोलत होते.
दरम्यान, इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात मी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असंही आव्हड यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्राचं पाणी हे गुजरातला जाता कामा नये- उद्धव ठाकरे
गांधींना मारणारा हिंदूच होता; उर्मिला मातोंडकरांचा हिंदुत्ववादी संघटनेवर निशाणा
माझ्या मुलाने बाबरी मशिदीबाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो- अबू आझमी
कोल्हापूरात भर सभेत मुका घ्या मुका; नगरसेवकाचा स्थायी सभापतीला मुका