मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी ऑनलाईन संवाद साधला.
आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील”, असं उद्धव ठाकरे यावेळी स्पष्ट केलं. “
“काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील. कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत. सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, मी अजून काही जणांशी बोलत आहे. मला वेगळा उपाय हवाय. लॉकडाऊन हा उपाय नाही. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण झाल्यानंतर देखील काही प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. पण या सगळ्यापेक्षा मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही नियम पाळा”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपच्या ‘या’ नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश”
कोहली नंबर-1! आयसीसी एकदिवसीय रॅंकिंगमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी
“अभिनेत्री आलिया भट्ट कोरोना पाॅझिटिव्ह”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छळ केल्यानेच सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा मृत्यू झाला”