Home महाराष्ट्र “खासदार उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडीचा मोठा धक्का”

“खासदार उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडीचा मोठा धक्का”

सातारा : भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडीने मोठा धक्का दिला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील खेड-शिवापूर तसेच सातारा-कोल्हापूर महामार्गावरील आणेवाडी या दोन टोल नाक्यांचं कंत्राट उदयनराजे यांचेकडून काढून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडं सोपविण्यात आलं आहे.

पुण्यातील खेड-शिवापूर आणि साताऱ्यातील आणेवाडी या दोन्ही टोलनाक्यांचं कंत्राट उदयनराजे भोसले यांचं समर्थक असलेल्या अशोक स्थापत्य कंपनीकडे होतं. मात्र आता हे कंत्राट त्यांच्याकडून काढून घेऊन पुण्याच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.

दरम्यान, आता हे कंत्राट पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके आणि शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोंडे यांच्याकडे देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच 3 एप्रिलपासून या दोन्ही टोल नाक्यांचं व्यवस्थापन बदलण्यात येणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले होते का?; जयंत पाटलांचा सवाल

सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका भाजप खपवून घेणार नाही- प्रवीण दरेकर

महाराष्ट्रातील लाॅकडाऊनसंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल- संजय राऊत