मुंबई : केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात मागे घेतली. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रातील भाजप सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्र सरकारने थट्टा केल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला. तसेच केंद्र सरकारने यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले होते का? असा सवालही जयंत पाटलांनी यावेळी उपस्थित केला.
From demonetisation to promising vaccines first in poll-bound states – every now and then @BJP4India likes to play a prank on the nation. Today it joked around with millions of depositors – maybe the past decisions were also an oversight with delight?#NationalJumlaDay https://t.co/fNvkUGtdCc
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका भाजप खपवून घेणार नाही- प्रवीण दरेकर
महाराष्ट्रातील लाॅकडाऊनसंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल- संजय राऊत
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी! शिवाजी विद्यापिठाला नॅक मानांकन