मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील अनेक भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रात लाॅकडाऊन संदर्भात अजुन कोणताही निर्णय घेण्यात आला नसुन चर्चा ही त्याच दिशेने सुरू असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच लाॅकडाऊन हा अंतिम पर्याय ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ते एका वृत्तवाहिनाशी बोलत होते.
महाराष्ट्रातील जनतेनं जर नियमांचं पालन केलं आणि सोशल डिस्ट्न्सिंगचं योग्यरित्या पालन केलं तर कोरोनाचा संसर्ग वाढणारच नाही आणि परिणामी महाराष्ट्रात लाॅकडाऊन लावण्याची वेळ येणारच नाही, असं राजेश टोपे म्हणाले. तसेच 50 टक्के लाॅकडाऊनचाही कोणता निर्णय अजुन घेतला गेलेला नाही., असंही राजेश टोपेंनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कोरोना रोखण्यासाठी कडक आणि कठोर निर्बंंध लावणं अत्यंत गरजेचं असून त्या दृष्टीने सरकार येत्या 2 दिवसात नवी नियमावली जाहीर करेल असं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच जिव वाचवण्यासाठी कडक लाॅकडाऊन हाच एक पर्याय सरकारकडे आहे आणि त्याचा आराखडा ही शेवटचा पर्याय म्हणुन बनवुन ठेवला जात आहे, असंही राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल- संजय राऊत
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बातमी! शिवाजी विद्यापिठाला नॅक मानांकन
“तृप्ती देसाई यांची पीडितेसह पत्रकार परिषद, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचे आरोप”
“दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर”