नवी दिल्ली : आजकालची तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत असते. यासाठी ते इन्स्टाग्राम, फेसबुक अशा साईट्सचा वापर करुन ओळख वाढवतात आणि पुढे जाऊन दुर्घटनेचा शिकार बनतात. असाच एक प्रकार एका सॉफ्टवेअर इंजिनिअर सोबत घडला आहे.
28 वर्षांचा अंकित हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मागच्या आठवड्यात सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्याला एका अनोळखी नंबरवरुन व्हिडीओ कॉल आला. त्याने तो व्हिडिओ कॉल उचलला आणि तो व्हिडीओ कॉल उचलताच एक मुलगी कपडे काढत होती. ते पाहून त्याला काहीच सुचलं नाही. अंकितने तातडीने तो कॉल कट केला. मात्र दुसऱ्या दिवशी मोबाईल हातात घेताच अंकितच्या पायाखालची जमीन सरकली.
दुसऱ्या दिवशी अंकितला एक मेसेज आला, ज्यामध्ये त्याच्याकडे गुगल पेवर पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात आली होती. एवढंच नाही तर जर पैसे ट्रान्सफर केले नाहीत तर त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकीही त्याला या मेसेजमधून देण्यात आली होती.
दरम्यान, अंकितने मोठं धाडस करून पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीप फेक टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे असे क्राईम्स होतात. अशा सर्व टोळी राजस्थान, यूपी, हरियाणा या भागात अधिक सक्रीय आहेत, त्यामुळे अनोळखी नंबरवरुन कुणी व्हिडीओ कॉल करत असेल तर असे कॉल उचलू नका तसेच कुणी ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असेल तर पोलिसांना यासंदर्भात माहिती द्या, असं आवाहन पोलिसांकडून यावेळी करण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सांगलीमध्ये बिबट्याचं दर्शन; सुरक्षेसाठी राजवाडा चाैक-पटेल चाैक रस्ता बंद
“बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन”
पैसे थेट खात्यात जमा करा मगच लाॅकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण
गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…