कराड : राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यावर काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना काही मागण्या केल्या आहेत. याबाबत चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढलं आहे.
लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या, तर लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवा तसेच लॉकडाऊन काळात बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. यासाठी प्रसंगी आमदार आणि खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा आणि शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ देऊ नका, अशा मागण्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने मागील वर्षी मार्च महिन्यात अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाउन घोषित केले होते. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला व भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाऊनचे नियोजन करणे आवश्यक आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
गिरीश महाजन यांनी केलेल्या टिकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
मोठी बातमी! वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात एम एस रेड्डी निलंबित
भाजप – राष्ट्रवादीचं सोडा; पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत आता अभिजित बिचुकलेंची एन्ट्री
पवारांची तब्येत बिघडली माहित आहे, पण सरकारचं माहित नाही- चंद्रकांत पाटील