मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ठाकरे सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
“चुकीचं नियोजन आहे. पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा जो विचार सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे. कारण गेल्या वर्षी जो लॉकडाउन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता, असं संजय निरुपम म्हणाले आहेत.
सावधगिरी बाळगणे आणि लसीकरण हे दोन पर्याय आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरु करुन जास्तीत जास्त लसीकरण केलं पाहिजे, असं मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, तुम्हीच चित्रपटगृहाच्या बाहेर आणि मॉलच्या बाहेर जे लोक येत आहेत त्यांना पकडता आणि जबरदस्तीने ट्रेस करता. त्यांच्याकडून 250 रुपये घेतले जातात. त्याऐवजी त्यांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस दिली पाहिजे. पण लॉकडाउन नको,” असंही संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
‘ही’ निवडणूक जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात- गोपीचंद पडळकर
“भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर हिला कोरोनाची लागण”
शिवसेनेचे ‘हे’ मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; किरीट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार
पवारसाहेब तुम्ही काळजी करू नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो- जयंत पाटील