मुंबई : “राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. सध्या केंद्राकडून जास्तीत जास्त मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र, राज्यातील भाजप नेते त्यासाठी कोणतीही मदत न करता फक्त राजकारण करत आहेत. अशी टीका शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्या मुंबईमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या.
“अनेक निर्बंध घालूनही लोक एकत नसतील तर कडक लॉकडॉऊनच्या दिशेनं जावं लागेल, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. पण काही लोक त्याचं राजकारण करत आहेत. काही भाजप नेतेमंडळींनी कोरोनाच्या काळात मुंबईतच उपचार घेतले आहेत. त्यांनी लसीकरणाचा फायदाही घेतलाय. सध्या केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणणे गरजेचे आहे. मात्र, कुठलीही मदत नकरता फक्त विरोध करायचा आणि नुसतं राजकारण करायचं एवढंच भाजपचे नेते करत आहेत,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत तर परिस्थिती आणखी चिंतानतक आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजप नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. यावरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे वक्तव्य केले.
महत्वाच्या घडामोडी –
नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला
होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर, मृत वाघापेक्षा जखमी अधिक खतरनाक- ममता बॅनर्जी
अमित शहा-शरद पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाकडून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; जयंत पाटलांनी दिली माहिती