पुणे : महाविकासआघाडी सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवं सरकार आलं पाहिजे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षांमध्येही सत्तेत होते. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत, असे नव्हे. पण उद्धव ठाकरे यांना कणा नाही. त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, सरकारमधील मंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करायला सांगितले होते, ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादीकडून हा आदेश देण्यात आला होता का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती का, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प का होतं?- चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीस नव्हे, आघाडी सरकारच अस्वस्थ झालंय- प्रवीण दरेकर
जीममध्ये अति वजन मारताय मग सावधान! बेंच प्रेस मारताना बॉडी बिल्डरच्या फाटल्या मांसपेशी, पहा व्हिडीओ
भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार व्हायचे का?; रोहित पवारांचा प्रश्न