मुंबई : राज्यात करोना रुग्णांचा विस्फोट झाल्याची स्थिती असून, दररोज 30 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यानं सरकारने चाचण्याचं प्रमाणही वाढवलं आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कामाचं कौतूक केलं आहे.
“गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच करोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अधिकाधिक 90हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच करोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी करोनाच्या दुसर्या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत.
असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा!
येणार्या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय!
(2/2)— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी”
“… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं!”
शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हे तपासण्याची गरज- नाना पटोले
अजून किती फेकणार नरेंद्र मोदीजी, हद्द केली राव; नाना पटोले संतापले