मुंबई : वाढत्या कोरोना रग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
दरम्यान, यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं!”
शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हे तपासण्याची गरज- नाना पटोले
अजून किती फेकणार नरेंद्र मोदीजी, हद्द केली राव; नाना पटोले संतापले
“मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पाॅझिटिव्ह”