मुंबई : भांडुप पश्चिमेकडील एल.बी.एस. मार्गावरील ‘ड्रीम्स मॉल’मध्ये गुरुवारी मध्यरात्री आग लागल्याने तेथील करोना रुग्णालयातील 12रुग्णांचा मृत्यू झाला. या मुद्यावरूनआता भाजपाने आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.
“भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत 12रुग्ण दगावले… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं!”, असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं! pic.twitter.com/Rt8jl3c9c9
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे हे तपासण्याची गरज- नाना पटोले
अजून किती फेकणार नरेंद्र मोदीजी, हद्द केली राव; नाना पटोले संतापले
“मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पाॅझिटिव्ह”