मुंबई : युपीएचे अध्यक्ष पद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देण्यात यावं, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहिती आहे. पण शरद पवार शिवसेनेत की राष्ट्रवादीत आहेत हे तपासण्याची गरज आहे, असा टोला नाना पटोलेंनी शरद पवारांना यावेळी लगावला.
संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते, सामना वृत्तपत्राचे संपादक आहेत हे आम्हाला माहित आहे. मात्र, अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचं नवं रूप पाहायला मिळत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते किंवा शरद पवारांच्या प्रवक्त्यासारखे ते वागत आहेत. युपीएचा जे हिस्साच नाही त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये, असं वक्तव्य करणं बरोबर नाही, असंही नाना पटोले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
अजून किती फेकणार नरेंद्र मोदीजी, हद्द केली राव; नाना पटोले संतापले
“मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पाॅझिटिव्ह”
देवेंद्रजी तुम्ही जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा; अमोल मिटकरींचा फडणवीसांना टोला