मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी IPS रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप केले होते.
आपल्याकडे याबाबतच्या संवादाचा 6.3 जीबीचा पेन ड्राईव्ह असल्याचा दावा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. सीताराम कुंटेंनी पाठवलेल्या अहवालानुसार, ज्या काळात फोन टॅपिंग केले त्या काळात भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्याच झाल्या नाहीत. त्यासोबतच वर्ष 2020 मध्ये काही अपवाद वगळता सर्व बदल्या या पोलिस अस्थापना मंडळ-1 च्या शिफारशीच्या आधारे शासनाने केल्या असल्याचं अहवालात म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
राज्याचे मुख्य सचिव श्री सीताराम जी कुंटे यांनी फोन टॅपिंग बद्दल जो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला त्यामध्ये कुठेही पेन ड्राईव्ह दिल्याचा उल्लेख नाही. मग देवेंद्रजीनी पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावे, असा टोमणा मिटकरी यांनी यावेळी लगावला.
राज्याचे मुख्य सचिव श्री सीताराम जी कुंटे यांनी फोन टॅपिंग बद्दल जो अहवाल सरकारकडे सुपूर्द केला त्यामध्ये कुठेही पेन ड्राईव्ह दिल्याचा उल्लेख नाही. मग देवेंद्रजीनी पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा हे जनतेला एकदा स्पष्ट सांगावे.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 26, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची आत्महत्या
फक्त 5 वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोप सारखे होतील- नितीन गडकरी
“सत्ता गेल्यानं भाजप विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत”
श्रेयस अय्यर INJURY! ना रहाणे, ना अश्विन, ना स्मिथ; ‘हा’ असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार