Home महाराष्ट्र केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला...

केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सल्ला

मुंबई : एकिकडे राज्यात वाझे आणि परमबीर सिंग यांच्या पत्रावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. अंतिम सुनावणीनंतर निर्णय होणार असून, या प्रश्नावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

“देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे. सुनावणीतील युक्तीवादाचा हवाला देत चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री वर्षा बंगल्यावर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो; नाना पटोले यांच फडणवीसांना प्रत्युत्तर

“मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिननं ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

“आम्ही तोंड उघडलं तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल”