मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजप नेत्यांनी गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महत्वाचे मंत्री आणि नेते दाखल झाले आहेत. या बैठकीत गृहमंत्र्यांवरील आरोपाबाबत महत्वपूर्ण चर्चेची शक्यता आहे.
उमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जयंत पाटील, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे मंत्री आणि नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत.
दरम्यान, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही? या बाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो; नाना पटोले यांच फडणवीसांना प्रत्युत्तर
“मुंबई इंडियन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूच्या वडिलांचे निधन; सचिननं ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
“आम्ही तोंड उघडलं तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल”
भाई जगताप एक असा टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं, पण डरपोक असल्यामुळे…; निलेश राणेंचा हल्लाबोल