Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं- देवेंद्र फडणवीस

मुंबई : भाजपाच्या शिष्टमंडळानं आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यपालांनी हस्ताक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं केली आहे. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

“मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातील मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक आहे. शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण”

हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही- निलेश राणे

देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांची जथ्थी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

“दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईन”