मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबजनक आरोपांमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता आर पी आय पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
“महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर राज्य सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचे पत्र आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात पाठविले आहे.” अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर राज्य सरकारवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचे पत्र आज केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात पाठविले आहे.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सत्ता नसल्यामुळे भाजप अस्वस्थ, म्हणून…- बाळासाहेब थोरात
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
खंडणी मागण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात; नवनीत राणांचा आरोप
‘या’ कारणामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”