मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. यावरुन भाजप खासदार मनोज कोटक यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.
“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कालपर्यंत म्हणत होते की गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज पवार म्हणतात, की राजीनाम्याची गरज नाही. याचा अर्थ 24 तासांत अनिल देशमुख यांनी असं काय सांगितलं, त्यांच्याकडे असं काय गुपित आहे, की शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली?” असा सवाल मनोज कोटक यांनी यावेळी केला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 15 फेबुवारीला पत्रकार परिषद घेतली आणि त्याचे पुरावे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर उपलब्ध आहेत. या गोष्टीचा विपर्यास करण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर का बोलत नाहीत? असंही मनोज कोटक यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का?- चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, केंद्र सरकारच बरखास्त करा- संजय राऊत
सचिन वाझेंना पुन्हा पोलिस दलात घेण्याचा निर्णय कोणाचा?; शरद पवारांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…
“शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारावं की कटाचा मास्टरमाईंड आणि वाझेंचा बाप कोण? “