मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
बातमीनुसार, शरद पवार यांनी खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अनिल देशमुख यांच्यासंदर्भातील कारवाईबद्दल अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना आज दिल्लीत बोलावले. याचदरम्यान, राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
तुमच्या गृहमंत्र्यांना महिन्याला 100 कोटींची वसुली हवी आहे, ही बातमी आणि पुरावे डिजी पद असणारा अधिकारी लेखी सादर करत असूनही तुम्ही देशमुखांवर काय कारवाई करावी याची अजून चर्चा करत आहात ? सत्तेची इतकी लालसा आहे की, आपण महाराष्ट्रससुद्धा विकायला तयार झाला आहात ?, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
तुमच्या गृहमंत्र्यांना महिन्याला १०० कोटींची वसुली हवी आहे, ही बातमी आणि पुरावे डिजी पद असणारा अधिकारी लेखी सादर करत असूनही तुम्ही देशमुखांवर काय कारवाई करावी याची अजून चर्चा करत आहात ? सत्तेची इतकी लालसा आहे की, आपण महाराष्ट्रससुद्धा विकायला तयार झाला आहात ?
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, केंद्र सरकारच बरखास्त करा- संजय राऊत
सचिन वाझेंना पुन्हा पोलिस दलात घेण्याचा निर्णय कोणाचा?; शरद पवारांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…
“शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारावं की कटाचा मास्टरमाईंड आणि वाझेंचा बाप कोण? “
आपलं सरकार कसंही वागलं तरी…; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला