Home महाराष्ट्र “एरवी दुपारनंतर कामाला सुरुवात करणारे उद्धव ठाकरे वाजेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?”

“एरवी दुपारनंतर कामाला सुरुवात करणारे उद्धव ठाकरे वाजेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?”

मुंबई : निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेच्या प्रश्नांसाठी सुद्धा बैठकाचा धडाका कधी लावणार, असा प्रश्न भाजप नेते संजय कुटे यांनी उपस्थित केला. ते मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

एरवी दुपारनंतर शासकीय कामकाजाला सुरूवात करणारे उद्धव ठाकरे गेल्या 3 दिवसांपासून बैठकामागून बैठका घेत आहेत. ही एक आश्चर्यजनक बाब आहे. वाजे यांच्यासाठी एवढ्या तत्परतेने ज्या बैठका घेतल्या जात आहेत, तशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार? असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याचं कुटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारने सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेचे निकष बदलल्यामुळे राज्यातील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी जेरीस आल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“NIA चा मोठा खुलासा! सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच”

चेल्यांना हाताशी धरुन उद्योगपतींकडून वसुली; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

“महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लागू केले पुण्यात नवे निर्बंध”

मोहम्मद अझरुद्दीनचा ‘सुपरमॅन’ अवतार, अफलातून रनआउट; पाहा व्हिडिओ