Home महाराष्ट्र “NIA चा मोठा खुलासा! सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच”

“NIA चा मोठा खुलासा! सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच”

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही. मात्र, अँटिलिया बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं ‘एनआयए’ने आता स्पष्ट केलं आहे.

एनआयए’ने यासंदर्भात माहिती दिली असून, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने PPE किट घातलेलं नसून साधा कुर्ता-पायजमा घातला असल्याचं देखील ‘एनआयए’ने सांगितलं आहे. या प्रकरणी अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’ करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ करत आहे.

अँटिलिया बाहेरचं एक सीसीटीव्ही फूटेज ‘एनआयए’ने तपासासाठी घेतल्यानंतर ते सोशल मीडियावर देखील व्हायरल होऊ लागलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती PPE किट घालून ‘अँटिलिया’च्या बाहेरून जात असल्याचं दिसत आहे. आता हे पीपीई किट नसून तो कुर्ता-पायजमा असल्याचं ‘एनआयए’ने स्पष्ट केलं आहे. ते सचिन वाझेच असून त्यांनी आपला चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मोठ्या हातरुमालाने झाकून घेतला आहे. आपली हालचाल कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून सचिन वाझेंनी कुर्ता-पायजमा घातल्याचं देखील एनआयएने सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चेल्यांना हाताशी धरुन उद्योगपतींकडून वसुली; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

“महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लागू केले पुण्यात नवे निर्बंध”

मोहम्मद अझरुद्दीनचा ‘सुपरमॅन’ अवतार, अफलातून रनआउट; पाहा व्हिडिओ

“भाजपचे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळं निधन”