मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीच्या प्रकरणरूण थेट वरुण सरदेसाई आरोप केले होते. त्याला युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाईंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मी सुसंस्कृत कुटुंबातील आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलंय. वरुण सरदेसाई पत्रकार परिषद घेऊन राणेंना प्रत्युत्तर दिलंय.
दरम्यान, राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असंही वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
अनिल देशमुख गृहमंत्रीपदी कायम राहणार?; जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राज्यातील राजकीय घडामोडींना वेग
एपीआय सचिन वाझेंच निलंबिन म्हणजे…; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही- रोहित पवार