Home महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली- चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवली- चंद्रकांत पाटील

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कालपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो, परंतु इथं उद्योगपतींच्या घातपाताची आणि समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचं समर्थन शिवसेना करत होती, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं आहे

दरम्यान, फक्त हत्येचं प्रकरण नाही, तर हा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी संशयास्पदरित्या सहभागी होता. पण जनतेला महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस आणि एनआयएवर पूर्ण विश्वास आहे आणि ते याप्रकरणाचा तपास करुन खऱ्या सूत्रधाराला अटक करुन या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करतील, असा विश्वासही चंद्रकातं पाटलांनी यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! सचिन वाझेंना 10 दिवसांची पोलीस कोठडी

‘सिक्सर किंग’ इज बॅक! सलग चार षटकार ठोकत युवराजने केले चाहत्यांचे मनोरंजन

…नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करु; पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

“काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष, तुम्ही भाजपला मत द्या”