मुंबई : MPSC ची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले होते. पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर देखील सहभागी झाले होते. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रेलाखातून गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.
विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?, असं म्हणत शिवसेनेनं सामनातून पडळकरांवर हल्लाबोल केला आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय? विरोधी पक्षहो, आगीत तेल ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करत आहे काय?, असे अनेक प्रश्न सामना अग्रलेखातून भाजपला केले आहेत.
देशातील वाढत्या बेरोजगारीचे मूळ केंद्र सरकारच्या बिनडोक आर्थिक धोरणात आहे. विरोधी पक्षाने जहाल व्हायला हवे ते बेरोजगारीच्या मुद्द्यावर, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विद्यार्थ्यांना जमवून भिकार राजकारण करीत आहे व विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना सरकारविरुद्ध लढायला भाग पाडत आहे., असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, विद्यार्थी आणि पोलिसांत झगडा लावायचा व आपण मजा बघायची अशी मानसिकता यात दिसते, असं म्हणत सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मी तर म्हणतो की हे सरकार एकही दिवस राहू नये- नारायण राणे
“भारत विरूद्ध इंग्लंड टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय”
‘वाजले की बारा’ व्हायरल लावणीसम्राट रिक्षाचालक बाबजी कांबळे यांना थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर
“उद्धव ठाकरे साहेब तुमची गाठ माझ्याशी आहे, इथले सगळे हिशेब द्यावेच लागतील”