Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयावरु भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

MPSC च्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे महाभकास आघाडी खेळत आहे. 10 दिवस अधिवेशन चाललं कोणाला कोरोना झाला??, या अगोदर अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांचं आयुष्य का उध्वस्त करताय?, असं निलेश राणे म्हणाले.

दरम्यान, मुंबईमध्ये व इतर ठिकाणी जिथे कोरोना सर्वाधिक आहे तिथे बियर बार, डान्स बार सकाळी पाच वाजेपर्यंत रोज चालतात, सोशल मीडियावर त्याचे पुरावे फिरतायत पण महाराष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांची MPSC परीक्षा पुढे ढकलली. असं हरामी सरकार कुठेच नसेल, अशी टीकाही निलेश राणेंनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नरेंद्र मोदीच 2024 ला पंतप्रधान असणार- अभिनेत्री कंगणा रणाैत

मुनगंटीवारांच्या वक्तव्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

खतरनाक! श्रीलंकन खेळाडूचा किरोन पोलार्डने घेतला लाजवाब कॅच; पहा व्हिडिओ

आता विष पिणार नाही तर पाजणार; मराठा आरक्षणावरून उदयनराजे संतापले