Home महाराष्ट्र जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटलांची टीका

जोपर्यंत मुख्यमंत्री गप्प, तोपर्यंत विधानसभा ठप्प; चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात भाजपाकडून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांनी हिरेन यांचा खून केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं असून, विधिमंडळ अधिवेशनातही तीव्र पडसाद उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

मनसुख हिरेन खून प्रकरणी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध, असं म्हणत प्रश्न कालपण तेच होते, प्रश्न आजही तेच आहेत. जो पर्यंत मुख्यमंत्री गप्प तो पर्यंत विधानसभा ठप्प, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही “

“रंगीला गर्ल तब्बल 12 वर्षांनी करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण”

नागपुरमध्ये भाजपला खिंडार; 31 नेते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“बाॅलिवूडचे मोठे निर्माते संजय लिला भन्साळी यांना कोरोनाची लागण”