मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही मागणी करत नाही. तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितलं. तुम्ही स्वत:साठी काही मागितलं असतं. पण तुम्ही ते केलं नाही., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, काही लोकं असतात, इकडे तिकडे काही करून स्वत:साठी काही तरी मागतात. तुम्ही मात्र कोकणासाठी सरकारी कॉलेज मागितलं. याचा मला अभिमान वाटतो. तसेच बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं. नाही तर लोक स्वत:साठी मेडिकल कॉलेज मागतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू, कुणालाच कुणाचा धाक उरला नाही- चंद्रकांत पाटील
अन् चांगला फटका मारल्यानंतरही सिब्लीला व्हावे लागले दुर्दैवीरित्या बाद; पहा व्हिडिओ
“मराठा आरक्षणासाठी उद्या जालनामध्ये आक्रोश मेळावा”
विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे- संजय राऊत