Home महाराष्ट्र “मराठा आरक्षणासाठी उद्या जालनामध्ये आक्रोश मेळावा”

“मराठा आरक्षणासाठी उद्या जालनामध्ये आक्रोश मेळावा”

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील साष्टे पिंपळगाव येथे उद्या (दि.07 मार्च) रोजी आक्रोश मेळावा होणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आली. मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे वीरेंद्र पवार, अंकुश कदम व अ‍ॅडव्होकेट अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली.

मराठा आरक्षणासाठी ग्रामस्थांचे गेले 45 दिवस शांततेत साष्टे पिंपळगावात आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षणासह वसतीगृह मिळावे, शिवस्मारक व्हावे अशी मागणी आहे. 3 वर्षांपूर्वी राज्य सरकारने वसतीगृह देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र याची अंमलबजावणी अजून झालेली नाही., असं वीरेंद्र पवार म्हणाले.

दरम्यान, अधिवेशनात तर सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या उण्यादुण्या काढण्यात व्यस्त आहेत. मात्र यामुळे समाजाचे नुकसान होईल. तसेच मराठा क्रांती मोर्चातर्फे एक स्वतंत्र वकील मराठा आरक्षण सुनावणीवेळी देण्यात येणार आहे, असंही वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे- संजय राऊत

प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना?; चित्रा वाघ यांचा सवाल

“मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण”

धक्कादायक! मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा संशयास्पद मृत्यू