नवी दिल्ली : सरकार बनवण्याबाबत शिवसेना आणि भाजपला विचारा, असं सुचक विधान राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी दिल्लीत केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना – भाजप एकत्र निवडणूक लढली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला विचारा, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.
राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्याबाबत आजपासून हालचालींना वेग येणार आहे. शरद पवारांनी घेतलेल्या पुुण्यातल्या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची यांची आज भेट घेणार असल्याचं पवारांनी सांगितलं आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या आज दिल्लीत होत असलेल्या भेटीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.