Home महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडली, पण त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मराठा आरक्षणावरच स्थगिती का आहे? मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असं म्हणत मराठा समाजाला आरक्षण द्या, नाही तर परिणामांना समोरे जा, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी सरकारला दिला.

आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक नसावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पण याच निर्णयात असाधारण स्थिती निर्माण झाल्यावर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकते, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे., असं पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. तेंव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत उच्च न्यायालयाला कनव्हिंस केलं होतं. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणही मिळालं आणि मागासवर्ग आयोगाला मंजुरीही मिळाली. मात्र, हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयाला कनव्हिंस करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे, असंही पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवारांनी शब्द पाळला; देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीला एका दिवसात बेड्या

कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवारांची महत्त्वपूर्ण घोषणा

…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांचा मिश्किली टोला

“सांगलीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याची हत्या”