मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेली मागणी योग्यच आहे. महाविकास आघाडीतील एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते विधान भवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणल्यानंतर त्यांनी 20 दिवसानंतर मंत्र्याचा राजीनामा घेतला. विरोधी पक्ष, जनता आणि मीडियाचा दबाव वाढला नसता तर त्यांनी राजीनामा घेतला नसता. पण उशिरा का होईना नैतिकतेच्या आधारे मंत्र्याचा राजीनामा घेतला., असं दरेकर म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीतच एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय नको, असं म्हणत धनंजय मुंडे यांनीही त्वरीत राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीने त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांविरोधात अदखलपत्र गुन्हा”
सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू; पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका
“…म्हणून भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”
“संजय राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती”