Home महाराष्ट्र “भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांविरोधात अदखलपत्र गुन्हा”

“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यांविरोधात अदखलपत्र गुन्हा”

वाशिम : भाजपच्या नेत्यांनी बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात भाजप नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

यामध्ये भाजपच्या मोठ्या नेत्यांची नावं घेण्यात आल्याचं समोर येतंय. तसेच या भाजप नेत्यांवर आणि प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नावं घेण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

दरम्यान, पूजा चव्हाण या मुलीची तर बदनामी झालीच. पण तिच्या परिवाराची आणि संपूर्ण बंजारा समाजाचीही बदनामी झाली. त्या पीडितेने आत्महत्या केली की? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र भाजपच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि तपासात अडथळा निर्माण केला, असा आरोप श्याम राठोड यांनी या तक्रारीत केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार टिकवण्यासाठीच हे सगळं सुरू; पंकजा मुंडेंची राज्य सरकारवर टीका

“…म्हणून भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”

“संजय राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती”

…त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; पंकजा मुंडेंचं मोठं विधान