Home महाराष्ट्र “…म्हणून भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”

“…म्हणून भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी”

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता भाजपने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

भाजप आता सुडाचे राजकारण करत आहेत. मूळ विषयाला बगल देण्याचे काम भाजप करत आहे. भाजपने कालपर्यंत संजय राठोड प्रकरण उचलून धरलं. आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केवळ पेट्रोल- डिझेलसह इतर मुद्द्याला बदल देण्यासाठी भाजप काहीही आरोप करत आहे, असं मिटकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राठोड यांनी आधीच राजीनामा दिला असता तर त्यांची प्रतिमा इतकी मलिन झाली नसती”

…त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा; पंकजा मुंडेंचं मोठं विधान

“अवघ्या 3 वर्षांत भाजपला रामराम ठोकत ‘या’ नेत्यानं केला काँग्रेसमध्ये गृहप्रवेश”

“वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यामुळंच पब-बार बिनधास्त सुरु”