मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी सायकल रॅली काढली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावर विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत नाना पटोलेंवर निशाणा साधला.
राज्य सरकारने पेट्रोलवर 27 रुपये टॅक्स लावला आहे. नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या टॅक्सविरोधातच असावं. गुजरात किंवा इतर राज्यांप्रमाणे 10 रुपयांनी पेट्रोल दर कमी करण्यात आले आहेत, तशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील दर कमी करावेत, यासाठीच त्यांनी हे आंदोलन केलं असावं, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
“हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवा”
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ते सर्व करु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“खुशखबर! पेट्रोल-डिझेलसह आता LPG सिलेंडर स्वस्त होणार”