मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. आरक्षणासंदर्भात इथे आणि दिल्लीत आपण जे काही करतो आहोत आणि करणार आहोत त्यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे, असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना एक जबाबदारी सोपविली आहे.
दिल्लीत जिथे कमी पडतो आहोत, असं वाटेल तेथे देवेंद्रजी तुम्हांला आम्ही जबाबदारी देत आहोत. आणि मला खात्री आहे की, याबाबतीत आपण सगळेजण आपले राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून समाजाच्या आशा आकांक्षा, अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करणार आहोत. सर्व प्रयत्न पणाला लावून हा न्याय हक्काचा लढा लढू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवा”
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ते सर्व करु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“खुशखबर! पेट्रोल-डिझेलसह आता LPG सिलेंडर स्वस्त होणार”
“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे काय महाराष्ट्रावर उपकार केले नाही”