“उत्तर प्रदेश, दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं”

0
191

उत्तर प्रदेश : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केलं. या घटनेचे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांनी स्वागत केले आहे.

हैदराबाद पोलिसांनी जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून काही शिकायला हवं, अशी प्रतिक्रीया मायावतींनी दिली आहे.

उत्तर प्रदेशातही महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पण राज्य सरकार झोपलं आहे. इथल्या आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांनाकडून प्रेरणा घेतली पाहिजे. मात्र, दुर्देवं आहे की उत्तर प्रदेशातील आरोपींना राज्याचे पाहुणे असल्यासारखी वागणूक दिली जाते. उत्तर प्रदेशात सध्या जंगल राज सुरु आहे, असं म्हणत मायावतींनी सरकरवर निशाणा साधला.

दरम्यान, आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी प्रतिक्रीया देत पिडीतेच्या वडिलांनी या एन्काउंटरबाबत तेलंगण सरकारचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हैदराबाद बलात्कार प्रकरण; “आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल”

हैदराबाद आरोपीं एन्काउंटरवर प्रकरणी ‘निर्भया’च्या आईची प्रतिक्रिया

ज्या ठिकाणी बलात्कर केला.. त्याच ठीकानी एन्काऊंटर झाला; हैदराबाद प्रकरणी आरोपींचा एन्काउंटर

मुख्यमंत्र्याना ‘हे’ खातं स्वत:कडे ठेवाण्याची इच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here